सरकारी नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार 

वेब टीम राहुरी : तालुक्यातील एका ३४ वर्षीय महिलेला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिला साडे सहा लाख रुपयांना गंडा घातला तसेच तिच्यावर वेळोवेळी शरीरिक अत्याचार  केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.याप्रकरणी दोघांवर फसवणूक व शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राहुरी तालुक्यातील पिडीत ३४ वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हटले,सन २०२० ते एप्रिल २०२२ या दरम्यान दोन आरोपींनी संगनमत करून या ३४ वर्षीय महिलेला सरकारी नोकरी लावून देतो.तसेच लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याकडून साडेसहा लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली.त्यानंतर वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने राहुरी पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी शकिल बागवान (रा.सोनई,ता.नेवासा) तसेच आनंदकुमार शहा (रा.पुणे) या दोघां विरोधात शारिरीक अत्याचाराचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर आरोपी पसार झाले असून राहुरी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे हे करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments