पुराव्यासाठी आणलेल्या बॉम्बचा कोर्टात स्फोट

पुराव्यासाठी आणलेल्या बॉम्बचा कोर्टात स्फोट 

वेब टीम पाटना : बिहारमधील पाटना स्थित सिविल कोर्ट परिसरात बॉम्ब स्फोट  झाला आहे. जखमी पोलिसांमध्ये एका कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमकुआन पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून स्फोटके जप्त करण्यात आली होती. ही स्फोटकं कोर्टात दाखवण्यासाठी दिवाणी न्यायालयात आणण्यात आली होती.

न्यायालयाच्या आवारातील एका खोलीत ही स्फोटके ठेवण्यात आली होती. काही वेळातच खोलीत ठेवलेल्या स्फोटकाचा अचानक स्फोट झाला. मोठा आवाज होऊन चार पोलीस स्फोटाच्या आवाक्यात आले. जखमींना पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटा नंतर गंभीर स्वरुपात जखमी कॉन्स्टेबलला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. अन्य दोन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवरही येथेच उपचार सुरू आहे. पाटना सिव्हील कोर्टातील एका खोलीत ठेवलेली स्फोटकांचा अचानक स्फोट  कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. स्फोटाच्या आवाजाने कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली. काही वेळासाठी लोकात पळापळ झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात पुराव्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बॉम्ब सोबत घेऊन आला होता. या प्रकरणात हा बॉम्ब एक पुरावा होता. मात्र यादरम्यान बॉम्ब अचानक फुटला आणि कॉन्स्टेबलदेखील या स्फोटात जखमी झाले.

Post a Comment

0 Comments