रामवाडीत 5 वर्षाखालील बालकांचे आधारकार्ड मोहीमेस 100% प्रतिसाद....
वेब टीम नगर : रामवाडी झोपडपट्टी मध्ये अहमदनगर पोस्ट ऑफिस आणि रामवाडी मधील अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विधमाने रामवाडी मध्ये 5 वर्षा खालील बालकाची नोंद करून त्यांना आधारकार्ड देण्या मोहीम हाती घेण्यात आली . रामवाडी मधील अंगणवाडी सेविका कायम नवनावीन उपक्रम राबवत असतात. झोपडपट्टी भागात एकूण चार अंगणवाडी असून त्या मधुन 230 बालकांना कायम लाभ मिळतो. पोषक आहार असो , तसेच अन्य सरकारी योजना असो , त्याचा लाभ मिळण्याकरिता झोपडपट्टी मधील अंगणवाडी सेविका कायम अग्रेसर असतात.. त्याचाच एक भाग म्हणून आज 5 वर्षाखालील बालकांना मोफत आधारकार्ड ची नोंदणी अभियान राबवून 100 % बालकाची नोंद करण्यात आली.
अहमदनगर टपाल कार्यालयाचे अधिकारी नितीन खेडकर, शैलेज राहीन्ज, सुनील थोरात यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. अभियान राबवण्या मागची भूमिका विषद करण्याबरोबरच वक्त्यानी अहमदनगर टपाल कार्यालया मार्फत चालविल्या जाणाऱ्या अन्य योजनाची माहितीहि दिली.
.अभियान यशस्वी करण्यासाठी रामवाडी मधील अंगणवाडी सेविका मनीषा पाटोळे, चंदा पाटोळे, सुनीता कसबेकर, अर्चना कांबळे, शशिकला पाचंगे, प्रीती ससाणे, सुनीता जगताप, सह...बालभवन च्या रजिया यांनी परिश्रम घेतले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत चे समन्वयक विकास उडानशिवे यांनी मानले.
0 Comments