माझ्याच आमदारांना मी मुख्यमंत्री नको
मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. कोणताही मोह मला अडवू शकणार नाही
वेब टीम मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकी लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधला यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले,"प्रशासनाचा काडीमात्र अनुभव नसतांना शरद पवार यांच्या आग्रहावरून मी मुख्यमंत्री झालो.शरद पवारांनी मला खूप साथ दिली. काँग्रेसच्या सोनिया गांधीही अधून मधून मला फोन करतात त्या सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे.पण माज्याच आमदारांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे. तर त्यांनी येऊन माझ्याशी समक्ष चर्चा करावी याक्षणी मी वर्ष बांगला सोडून मातोश्री वर राहायला जात आहे.मुख्यमंत्री पदच काय मी शिवसेनापक्ष प्रमुख पदही सोडायला तयार आहे.मला कोणताही मोह अडवू शकत नाही.
कोविडच्या काळात कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना त्या संकटाला आपण यशस्वी रित्या तोंड दिल.त्या काळात झालेल्या निरनिराळ्या सर्व्हे मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझी गणना केली गेली.आज आरोप होतो,आजची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही.२०१२ साली बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे ६३ आमदार निवडूवून आणले.तेव्हा पासून आजपर्यंत जे काही मिळालं त्याच काय? असा प्रश्न विचारून ज्यांना कोणाला मी नको असेन त्यांनी समक्ष येऊन माझ्याशी चर्चा करावी.
मात्र चर्चा करणारे शिवसैनिक असावेत दुसऱ्या कोणत्याही फालतू माणसाला मी काही देणं लागत नाही मात्र सच्चा शिवसैनिकांना मी उत्तर देणं लागतो त्यांनी जर सांगितले तर मुख्यमंत्री पदच काय तर शिवसेना पक्ष प्रमुखाचे पदही मी सोडायला तयार आहे.माझ्या नंतर होणारा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असल्यास मला त्याचा आनंदच होईल.असे उद्धव ठाकरे म्हणाले.
0 Comments