शनी चौथऱ्यावर महिलांना तैलाभिषेकास परवानगी

शनी चौथऱ्यावर महिलांना तैलाभिषेकास परवानगी

वेब टीम सोनई :  नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील चौथरा भाविकांना खुला तर झालाच, या शिवाय महिलांना प्रथमच तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्या संदर्भात, शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र काही वर्षे शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंद करण्यात आला होता. 

चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळाला याकरिताभूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते.त्यानंतर देवस्थान ट्रस्टने केवळ पादुकांपर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र  आता विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पुरुषांसोबतच महिलांनाही तैलाभिषेक करण्यास प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी ट्रस्टची ५०० रुपयांची पावती घ्यावी लागणार असल्याची माहिती,विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस आप्पासाहेब शेटे यांनी दिलीय. शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देश-विदेशातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments