मुख्याध्यापिका सौ. नगरकर यांना सेवानिवृत्ती निरोप

मुख्याध्यापिका सौ. नगरकर यांना सेवानिवृत्ती निरोप

वेब टीम कोरडगाव : दादा पाटील ढाकणे माध्यमिक विद्यालय अकोले ता. पाथर्डी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ नगरकर सुनीता हेमंत या नुकत्याच   सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा गौरव समारंभ संस्कार भवन पाथर्डी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते माजी जि. प.सदस्य श्री रामकृष्ण   नांगरे व प्रमुख अतिथी होत्या एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव प्रतापकाका ढाकणे यांच्या सुविद्य  पत्नी व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ प्रभावती ढाकणे. यावेळी एकलव्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री श्रीकांत निराळी व संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि   नगरकर व डोंगरे कुटुंबीय तसेच  सर्व एकलव्य परिवार उपस्थित होता. 

 सौ प्रभावती ढाकणे यांच्या हस्ते नगरकर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आल.  यावेळी प्रभावती ढाकणे यांनी एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री आदरणीय ढाकणे साहेब व सचिव प्रताप काका ढाकणे यांच्या वतीने मॅडमला भावी आयुष्यासाठी  शुभेच्छा दिल्या आणि आपल्या 34 वर्षाच्या सेवेत गणिता सारखा अवघड विषय मुलांना सोपा करून शिकवला आणि शाळेतील  मुलींना विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सत्काराला उत्तर देताना  नगरकर मॅडम यांनी सांगितले  की, ढाकणे साहेबांचे शुभाशीर्वाद व प्रतापकाका यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून मला दिलेली सर्व पदे व सौ. काकिंनी दिलेली भक्कम साथ  यामुळेच मी आज मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त होत आहे.  या पदावर काम   करत असताना मला माझ्या.  कुटुंबीयांचे व एकलव्य परिवाराचे  सहकार्य लाभल. त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केल.

 अध्यक्षीय भाषणात नांगरे पाटील यांनी ,या कार्यक्रमाला सर्व शिक्षक उपस्थित आहेत.अशा विद्वत सभेचा अध्यक्ष होण्याचा मन मला मिळाला यांबद्दल संयोजकांचे आभार मानले   आणि मॅडमला त्यांच्या सेवानिवृत्ती साठी शुभेच्छा दिल्या यावेळी श्री संतोष डोंगरे ,सीमा झांबरे ,बाबूजी आव्हाड विद्यालयाचे प्राध्यापक मोहिते ,ज्येष्ठ शिक्षिका शेटे मॅडम  ,दादा पाटील विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गर्जे सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्रीमती वायल मॅडम व गणेश खेडकर यांनी केले .प्रास्तविक श्री शिरसाट सर यांनी केले तर अमोल मुळे यांनी सर्वांचे आभार मानले .हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दादा पाटील ढाकणे विद्यालयाच्या सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमानंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला. 

Post a Comment

0 Comments