आजच होणार शपथविधी,एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री
वेब टीम मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तास्थपानेसंदर्भात सध्या सुरु असणाऱ्या बैठकीनंतर दोन्ही नेते राजभवनावर गेले.गोव्यामधून मुंबईत दाखल झालेले शिंदे हे ३९ बंडखोर शिवसेना आमदारांचं समर्थन भाजपाला असल्याचं समर्थन पत्रसोबत घेऊ आले आहेत. हे पत्र राज्यपालांकडे दिलं जाणार आहे
दोन्ही नेते राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून सत्तास्थपानेचा आणि बहुमत असल्याचा दावा आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजभवनात यासाठी तयारी करण्यात आली आहे. सध्या एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले यावेळी फडणवीसांबरोबरच चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे यासारखे भाजपाचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत.
सत्तास्थापनेचं गणित कसं…
भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्न आहे.मध्यरात्री सर्व बंडखोर आमदार गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. २२ जून पासून हे आमदार गुवाहाटीमधील ‘रेडिसन्स ब्लू’ हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.
३० जूनच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर ते काल म्हणजेच २९ जून रोजी गोव्यात दाखल झाले. गोव्याचे मुख्यमंत्री मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास या आमदारांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. सध्या भाजपाकडे १०६ चे संख्याबळ असून ४८ आमदारांच्या मदतीने भाजपाला बहुमताचा १४५ चा आकडा सहज गाठणं शक्य आहे.
0 Comments