बलात्काराची खोटी तक्रार द्यायला लावल्याच्या आरोपाने चित्रा वाघ अडचणीत

बलात्काराची खोटी तक्रार द्यायला लावल्याच्या आरोपाने चित्रा वाघ अडचणीत 

वेब टीम बीड : भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ  या पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. कारण एका बलात्कार पीडितेने चित्रा वाघ यांनी खोटी बलात्काराची  तक्रार द्यायला लावल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोप प्रकरणाने आता वेगळ वळणं घेतलं आहे. चित्रा वाघ यांच्यावर याआधीही असे आरोप झाले आहेत. आत्ता पुन्हा असेच आरोप झाल्याने ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक आरोप प्रकरणात असेच आरोप पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर केले होते. तेव्हाही बराच राजकीय वादंग झाला होता. आत्ताही या आरोपांनंतर पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

हे सर्व सुरेश धस यांच्या सागण्यावरून झालं आहे, अशी तक्रार आता पीडितेने दिली आहे. नदमोद्दीन शेख नावाच्या वक्तीला धस यांनी मेहबूब शेख यांना एखाद्या प्रकरणात अडकवं असे सांगितले होते. त्यानंतर नदमोद्दीन शेख याने मला लग्नाचे अमिष दाखवू माझ्यावर अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ शुटिंगही केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने मला खोटी तक्रार द्यायला लावली. तर त्यानंतर या नदमोद्दीन शेख यानेच पीडितेला चित्रा वाघ यांच्याकडे नेले. त्यावेळी आता जर तु तक्रार मागे घेतली तर तुझ्याच अडचणी वाढतील. तुलाच पोलीस अटक करतील, असे चित्रा वाघ यांनी धमकावल्याचे तरुणीने आपल्या आरोपात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments