पुजार्‍याने केले पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म

पुजार्‍याने केले पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म 

आरडाओरडा ऐकून आई पोहोचली

वेब टीम अलवर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका मंदिराच्या वृद्ध पुजाऱ्याने मुलीवर बलात्कार केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून आईला घटनेची माहिती मिळाली. यानंतर लोकांनी आरोपी पुजाऱ्याला बेदम मारहाण केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पुजारीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, आरोपी पुजारी सुनील उर्फ ​​सुन्ना याने तिच्या मुलीला फूस लावून मंदिरात नेले. जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून मी तिथे पोहोचले  तेव्हा आरोपी तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करत होता.तिच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. यादरम्यान त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पुजारी सुनील हा राजगडच्या बस्ती गावचा रहिवासी आहे.त्याचे लग्न झालेले नाही. अनेक वर्षे तो गावातील मंदिरात पुजारी म्हणून काम करत होतो . पुजारी असे काम करू शकतात? अशी लोकांत  चर्चा होती  , त्यांना त्याची अपेक्षा नव्हती.

येथे एका निष्पापावर बलात्काराचे प्रकरण समोर आल्यानंतर एसपी तेजस्वानी गौतम रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडितेच्या आईसह आसपासच्या लोकांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले, पीडितेचे मेडिकल करण्यात आले आहे. यासोबतच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments