पैगंबरावरील टीकेनंतर भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी

पैगंबरावरील टीकेनंतर भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी 

दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरात निशाण्यावर 

वेब टीम नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टीकेच्या प्रकरणी आता दहशतवादी संघटना अल कायदानेही उडी घेतली आहे. अल कायदा इन द सबकॉन्टिनेंट (AQIS) ने भारताला धमकी देणारे पत्र जारी केले आहे. या पत्रात दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावरील तारीख 6 जून 2022 आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

जर आम्ही आमच्या पैगंबराच्या अपमानाचा बदला घेऊ शकत नसलो तर आमच्या माता आम्हाला पुन्हा पाहू शकणार  नाहीत, असे अल कायदाने पत्रात लिहिले आहे.

अल कायदा म्हणते - भगव्यावाद्यांना संपवणार

अल कायदाने पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकाने टीबीच्या चर्चेदरम्यान इस्लामचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ, असेही अल कायदाने पुढे म्हटले आहे. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके जोडू जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. ते  त्याच्या घरात लपून राहू शकणार नाही किंवा सैन्य त्याला वाचवू शकणार नाही.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती

एका बातमीच्या चर्चेत भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्याचा मुस्लिम समुदाय सातत्याने विरोध करत आहे. नुकतेच शर्मा यांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर पक्षाने तिला निलंबित केले, त्यानंतर तिने आपले विधान बिनशर्त मागे घेत असल्याचे सांगितले. शर्मा यांच्यावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गुन्हेही दाखल आहेत.

मुस्लिम देश विरोध करत आहेत

५७ मुस्लीम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) प्रथम या मुद्द्यावर विरोध केला आणि त्यानंतर काही अरब देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. यासोबतच इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, यूएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया, तुर्की, मलेशिया आणि पाकिस्तान या देशांनीही या वक्तव्याला विरोध केला आहे.

Post a Comment

0 Comments