निरोगी आयुष्यासाठी वजन व्यवस्थापन
माणसाची जीवनशैली दिवसेंदिवस बदलत आहे.या बदलत्या जीवनशैलीचे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. अनेकदा आपण पाहतो अचानक एखाद्याचे वजन वाढू लागते किंवा कमी होऊ लागते . या समस्येतून निरनिराळ्या व्याधी मानवाच्या शरीरामध्ये घर करायला लागतात. यातून सुटका मिळवण्यासाठी गरज असते ती वजन व्यवस्थापनाची, त्यासाठी आवश्यकता असते ती आरोग्य सल्लागाराची. प्रफुल्ल पंचमुख हे आरोग्य सल्लागार (वेलनेस कन्सल्टंट) असून त्यांच्याशी केलेली बातचीत.
वजन व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिरात सकाळच्या सत्रात व्यायाम आणि उरलेल्या वेळात आरोग्य विषयक समुपदेशन केले जाते . सध्या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सुमारे साडेतीन हजार कुटुंब झूम मीटिंग च्या माध्यमातून एकाच वेळी व्यायाम करतात असे प्रफुल्ल पंचमुख यांनी सांगितले.
या शिबिरात सहभागी होताना तीन दिवस मोफत प्रात्यक्षिक (डेमॉन्स्ट्रेशन) दिले जाते. त्यानंतर वैयक्तिक रित्या संपर्क साधून संबंधित व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स काढला जातो. त्यातून त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती कळते वजन व प्रथिनांचे रिपोर्ट अभ्यास अभ्यासले जातात. त्यानुसार त्या व्यक्तीचा अभ्यास करून त्या व्यक्तीला 80 टक्के आहार आणि 20 टक्के व्यायाम या माध्यमातून आयुष्यभर तंदुरुस्त कसे राहता येईल याबद्दल मार्गदर्शन केले जाते.
रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे ,आम्लपित्त ,पचनाचे आजार, वजन वाढणे व कमी होणे, शरीरातील हार्मोन्स असंतुलन ,थायरॉईड बाबतचे आजार, नैराश्य, मंदपणा, आळस, झोप न येणे ,ॲलर्जी, दमा ,हृदयविकार, डायबिटीस, लहान मुलांमधील समस्या मन एकाग्र न होणे चिडचिडेपणा, ,वातविकार ,संधिवात,मणक्यांचे आजार ,वारंवार सर्दी अशा असंख्य रोगांच्या पीडितांना आतापर्यंत गुण आलेला असून अनेकांना या व्याधीतून मुक्ती मिळाली आहे.
लहान मुलांच्या बाबतीत समुपदेशन करताना मानसिक बौद्धिक आणि शारीरिक वाढ लक्षात घेऊन अभ्यासाअंती त्यांच्या आहारात बदल केले जातात . त्यांच्याकडून वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करून घेतले जातात. जेणेकरून लहान मुलांच्या मनाची एकाग्रता वाढेल आणि चिडचिडेपणा कमी होईल याकडे लक्ष दिले जाते.
बदललेल्या जीवनशैलीमुळे ज्यांचे वजन वाढले आहे, त्यांना या शिबिरातून विशेष फायदा झाल्याचे जाणवते. खाऊन पिऊन वजन कमी करा असे हे समुपदेशन असल्याने महिन्याला तीन ते चार किलो वजन हमखास कमी होते . त्याचप्रमाणे ज्यांना वजन वाढवायचे आहे मात्र ही प्रक्रिया हळूहळू होत असल्याने अशा व्यक्तीचे वजन एक ते दीड किलो प्रति महिना दराने वाढते. सदृढ शरीर निरोगी आरोग्य यासाठी वजन व्यवस्थापनाची आवश्यकता असते आणि त्यासाठी गरज आहे ती चांगल्या आरोग्य सल्लागाराची.
प्रफुल्ल पंचमुख
आरोग्य सल्लागार वेलनेस कन्सल्टंट
संपर्क-८७८८०५७८४९
0 Comments