आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाला कुलूप ठोकून सरकारला जाब विचारू : वैभव पिचड
वेब टीम अकोले: महाआघाडी सरकार आदिवासींच्या विकास योजना पासून त्यांना दूर ठेवून आदिवासींचा पैसा इतरत्र वळवत आहेअसा आरोप करताना .राज्यात व तालुक्यात हिरडा खरेदी केंद्र बंद, खावटी योजना बेभरोसे,ठक्कर बाप्पा बंद,भाताला अनुदान नाही .याबाबत आमदार का बोलत नाही.येत्या आठ दिवसांत हिरडा केंद्र सुरू न झाल्यास आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाला कुलूप ठोकून पुन्हा रस्त्यावर उतरवून आघाडी सरकारला जाब विचारू असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी महामंडळ कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना दिला.
सोमवारी राजूर येथे राजूर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत शक्ती प्रदर्शन करत बाजारपेठेतून मोर्चा काढून आदिवासी विकास महामंडळ कार्यालयासमोर हिरडा व भात टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.प्रसंगी बोलताना माजी आमदार वैभव पिचड म्हणले तालुका आदिवासी, दुर्गम व डोंगराळ आहे. तालुक्यामध्ये हिरडयाचे उत्पादन मोठया प्रमाणात असून यापूर्वी आपल्या आदिवासी विकास महामंडळामार्फत हिरडा खरेदी केला जात होता. हिरडा खरेदी केंद्रे हे मार्च/एप्रिल महिन्यातच सुरु होत होते. परंतु यावर्षी अद्यापपर्यंत हिरडा खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत. सध्या जुन महिन्याला सुरुवात होत आहे. आदिवासी शेतकयांनी वाळून ठेवलेला हिरडा जर वेळेत विकला गेला नाही तर शेतकयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सध्या खाजगी बाजारात कवडीमोल किंमतीत हिरडा खरेदी केला जात आहे. हिरडा विक्रीतून येणाया पैशातून खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, खते यांची खरेदी करण्यास उपयुक्त ठरते. जर हा हिरडा विकला गेलाच नाही तर अनेक शेतकरी खरीप हंगामाचे बी-बियाणे, खते खरेदी करु शकत नाही परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले जाऊ शकते. तसेच मागील वर्षी भात खरेदी केला होता, त्याचाही अद्यापपर्यंत बोनस मिळालेला नाही.
म्हणून आपण सर्व शेतकयांची दखल घेवून आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत अकोले, व जुन्नर, जि.पुणे तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी तात्काळ हिरडा खरेंद्री केंद्रे सुरु करुन मागील वर्षी भात खरेदीचा बोनस मिळावा. अन्यथा महामंडळाला कुलूप लावून सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा दिला.प्रास्तविक संतोष बनसोडे यांनी उपसभापती दत्ता देशमुख,गोरक्ष परते,जयराम ईदे,विजय भांगरे,गोकुळ कानकाटे,गणपत देशमुख,सुरेश गभाले,भरत घाणे , यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना आमदार लहामटे यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त करून निषेध केला.
तालुक्यात खताचा अनियमित पुरवठा,काळाबाजार,स्वस्थ धान्य काळाबाजार, भाताला अनुदान नाही,आदिवासी योजना बंद,हिरडा केंद्र बंद मग हे आमदार झोपा काढता का? याना आदिवासींना पोटात अन्न देण्यापेक्षा पोटात लाथा मारणे जमते असा टोला आजी आमदार यांना माजी आमदार वैभव पिचड यांनी लगावला.
0 Comments