श्री क्षेत्र जेऊर हैबती दिंडीचे प्रस्थान

श्री क्षेत्र जेऊर हैबती दिंडीचे प्रस्थान 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र जेऊर हैबती येथील पायी दिंडी सोहळ्याचे  श्री क्षेत्र पंढरपुरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या कृपाशीर्वादाने, हभप कृष्णा महाराज उगले यांचे मार्गदर्शनाखाली, हभप सुभाष महाराज औटी यांचे नेतृत्वाखाली व जय हनुमान भजनी मंडळ यांचे सहकार्याने या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा. डॉ. नारायणराव म्हस्के सर, प्रदिप ताके सर, गणुकाका शेटे, गोरक्षनाथ कानडे, बडे मल्टिस्पेशालिस्टी हॉस्पिटलचे डॉ. बडे, योगशिक्षक दिगंबर रिंधे, महेशभैय्या उगले, माजी सरपंच निवृत्ती म्हस्के, मोहनराव ताके यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच दिंडीस निरोप देण्यासाठी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, सदस्य, पोलिस पाटील व समस्त जेऊर हैबती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानप्रसंगी गावातील घरांसमोर सडा रांगोळी करुन दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी जेऊर हैबती  परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या विठुनामाच्या गजराने वातावरण भक्तीमय झाले होते.

Post a Comment

0 Comments