माजी पंचायत समिती उपसभापती मधुकर पिचड यांना घरात घुसून मारहाण

माजी पंचायत समिती उपसभापती मधुकर पिचड यांना घरात घुसून मारहाण 

वेब टीम अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड यांना घरात घुसून तिघा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथे घडली असुन याबाबत राजूर पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यातील कोहंडी गावातील आरोपी शिवाजी डोळससह ३ व्यक्तींनी पिंपरकणे येथील फिर्यादीच्या राहत्या घरात घुसून मारहाण केली.पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड यांना ही मारहाण झाली आहे. हाणामारीत मधुकर पिचड यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे

. राजुर पोलीस ठाण्यात फिर्याद देताना पिचड यांनी म्हटले आहे की मी घरात काम करीत असतानाच कोहंडी गावांतील शिवाजी डोळस व त्यांच्या दोन साथीदारांनी घरात घुसून मला मारहाण केली. सदरील फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात शिवाजी डोळससह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास राजुर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments