विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
वेब टीम कर्जत : विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील धुमाळ वस्ती येथे मंगळवारी सकाळी घडली.
सचिन हनुमंत धुमाळ व अमोल हनुमंत धुमाळ या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, बेनवडी मधील धुमाळ वस्ती येथे राहत असलेल्या सचिन हनुमंत धुमाळ (वय २२ वर्ष) यांनी गाईची धार काढून सोमवारी रात्री दुधाची बादली पत्र्याच्या शेडवर अडकवून ठेवली.
मंगळवारी सकाळी अडकवलेली बादली काढण्यासाठी ते गेले. त्या बादलीला विजेचा प्रवाह उतरलेला होता.
बादली पकडताच त्यांना जोरदार धक्का बसला. ते ओरडले असता त्यांचा भाऊ अमोल हनुमंत धुमाळ (वय २५ वर्ष) हा त्याच्या मदतीला गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यामध्ये ते दोघे युवक जागीच मरण पावले.
या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
0 Comments