प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 

वेब टीम नगर : अहमदनगर शहारत गोल्ड कौंसिल क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरू करण्यासाठी ,लागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे,संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना नाशिकच्या लाच लुचपात प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून

प्रत्येकी १५०००/- (पंधरा हजार रुपये) याप्रमाणे एकूण ३०,००० (तीस हजार )रु लाचेची मागणी तक्रारफरकडे करण्यात आली होती .२८ जून रोजी पंचांसमक्ष प्रत्येकी १५,०००/- (पंधरा हजार )असे एकूण ३०,०००/-(तिस हजार रु)लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .

प्रवीण मनोहर जोशी , वय ५७, धंदा- नौकरी,प्रादेशिक अधिकारी ,वर्ग- १, नेमणूक- प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद , अति पदभार :-प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक रा- औरंगाबाद आणि कुशल मगननाथ औचरमल वय :-४२.पद.:-क्षेत्र अधिकारी वर्ग :-२, नेम .:-प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून या वर्षातील मोठी कामगिरी नाशिक लाच लुचपत विभागाने केली आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल बागुल तसेच पोलीस नाईक किरण भालेराव, पोलीस नाईक अजय गरुड, पोलीस नाईक वैभव देशमुख, पोलीस नाईक नितीन डावखर यांच्या पथकाने ही करावाई केली आहे.

Post a Comment

0 Comments