कडीकोयंडा तोडून दागिने चोरणारी महिला गजाआड

कडीकोयंडा तोडून दागिने चोरणारी महिला गजाआड  

वेब टीम नगर :  दि.३०/०३/२०२२ रोजी फिर्यादी अॅड. सुरेंद्र सोनाजी काळोखे राहणार पंतनगर श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की पंतनगर येथील राहत्या घराचे दरवाज्याचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व चांदीचे पैंजण कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुरनं.२१८/२०२२ भादविक ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन रामराव ढिकले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा राणी महादेव भोसले रा.वडाळी रोड,गजानन नगर, श्रीगोंदा यांनी केला आहे.  

 गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले.सदर महिला हीस सिसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमी मिळाल्यावरून दि.२२/०६/२०२२ रोजी श्रीगोंदा येथून ताब्यात घेतले महिला आरोपीकडे वरील गुन्हा बाबत विचारपूस केली असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता वरील घरफोडी केल्याची कबुली दिली.गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल १,००,०००( एक लाख रुपये) किमतीचा त्यात सोन्याचे दागिने गंठण १५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ७५ ग्रॅम वजनाचे २५,००० रू रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली काळया रंगाची एक्टिवा गाडी हस्तगत करण्यात आलेली आहे.

 महिला आरोपी सराईत गुन्हेगार तीच्या कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.रामराव ढिकले,पोसई. समिर अभंग,सफौ. अंकुश ढवळे,पोना. गोकुळ इंगवले,पोकॉ. प्रकाश मांडगे,पोकॉ. किरण बोराडे,पोकॉ. दादासाहेब टाके,पोकॉ. अमोल कोतकर यांनी केली आहे.(फोटो: घरफोडी )


Post a Comment

0 Comments