जेऊर हैबती दिंडीचे गुरुवारी प्रस्थान

जेऊर हैबती दिंडीचे गुरुवारी प्रस्थान 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील पायी दिंडीचे गुरुवारी (दि.३०) श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. वै. हभप दत्तोबा महाराज रिंधे यांच्या कृपाअशिर्वादाने व हभप कृष्णा महाराज उगले यांचे मार्गदर्शनाखाली तसेच हभप सुभाष महाराज औटी यांचे नेतृत्वाखाली व जय हनुमान भजनी मंडळ यांचे सहकार्याने या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या दिंडी सोहळ्यात पहाटे ४ ते६ काकडा, ७ ते ११ वाटचालीचे अभंग, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरीकिर्तन व जागर अशा दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडी सोहळयास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक डॉ. प्रा. नारायणराव म्हस्के सर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचात सदस्य चेअरमन, व्हा.चेअरमन सोसायटी सदस्य ,पोलिस पाटील व जेऊर हैबती ग्रामस्थ व जय हनुमान भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे.

Post a Comment

0 Comments