वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

वेब टीम अहमदनगर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अहमदनगर जिल्हयात दुस-या टप्प्यातील ग्रामीण भगातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज करण्याची सुविधा पाणी व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे.या प्रणालीव्दारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबाना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरीता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे. अशी माहीती आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिली आहे.

स्वच्छ-भारत मिशन ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत  महत्वाकांक्षी योजना,केंद्रशासन व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमाव्दारे राबविण्यात येत आहे.ग्रामीण भागातील स्वच्छतेसंदर्भात जनजागृती निर्माण करणे,स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे व उघडयावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी लाभार्थी कुंटुबाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पुर्ण केल्यानंतर रुपये 12000/- अनुदान देण्यात येते.या योजनेअंतर्गत दारीद्रय रेषेखालील सर्व कुटुंब प्रमुख व दारीद्रय रेषेवरील अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती,लहान व अल्पभुधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर  दिव्यांग कुटुंब प्रमुख आणि महिला कुटुंब प्रमुख हे घटक अनुदानास पात्र करण्यात आले आहे.राज्यामध्ये स्वच्छतेचा जागर कायम राहावा व स्वच्छ भारत अभियान ग्रामिण अंतर्गत शौचालय सुविधेपासुन कोणीही वंचित राहु नये, याकरीता  आता दुस-या टप्प्या राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध व्हावीत यासाठी घरी बसुनच ऑनलाईन प्रणालीव्दारे वैय्यक्तिक शौचालया करीता अर्ज करण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे.ऑनलाईन प्रणालीव्दारे वैयक्तिक शौचालयाकरीता अर्ज खालील लिंक व्दारे करता येईल https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवा https://swachhbharatmission.gov.in/sbmcms/index.htm   या  लिंक व्दारे नोंदणी  पुर्ण केल्यानंतर अर्जदारास वैयक्तिक शौचालय बांधकामाकरीता  व अनुदान प्रोत्साहन अनुदान वितरणाकरीता मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.पात्र कुटुंबानी या सुविधेचा लाभ घेऊन राज्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन सुरेश शिंदे, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परीषद अहमदनगर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments