पोलीस कर्मचाऱ्यानेच केला अधिकाऱ्यावर चाकू हल्ला

पोलीस कर्मचाऱ्यानेच केला अधिकाऱ्यावर चाकू हल्ला 

वेब टीम औरंगाबाद : शहर पोलिस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यातच चाकू हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चाकू हल्ला करणारा सुद्धा पोलिस कर्मचारीच आहे. या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. व्यंकटेश केंद्रे असे हल्ला झालेल्या पोलीस अधिकारी यांचे नाव आहे.

शेख मुजाहिद असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या एका तक्रारदाराला शिवीगाळ करत असल्याने व्यंकटेश केंद्रे या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यास झापले होते त्याचा राग मनात ठेवून पोलीस कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. व्यंकटेश केंद्रे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments