देवराईत सोसायटीच्या निवडणुकीतून वाद

देवराईत सोसायटीच्या निवडणुकीतून वाद 

तलवारी ,सुरे,कुऱ्हाडीने हाणामारी ,एकाचा मृत्यू 

वेब टीम पाथर्डी : तालुक्यातील देवराई येथील सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटात धुमश्चक्रि झाली, यात एका तरुण मयत झाला,तर चार ते पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील मयताचे अजय गोरक्षनाथ पालवे (वय २३) असे नाव आहे.

याबाबत प्राथमिक समजलेले माहिती अशी की, देवराई (ता.पाथर्डी) सोसायटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी गटाकडून डिजे वाजऊन मिरवणूक सुरू होती .त्याच वेळी पराभूत गटातील १५-२० जण तलवार ,सुरे ,कुर्हाडी घेऊन मिरवणुकीत शिरले . यानंतर दोन गटात शनिवारी (दि.१८) सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास चांगलीच हाणामारी झाली, यात विजयी गटातील अजय पालवे याला जबर मारहाण झाल्याने तो मयत झाला. तर उर्वरित जखमी झाले. यात जखमींना उपचारार्थ अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पाथर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

या  घटनेनंतर देवराई परिसरात मोठ्या प्रमाणावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता . सोनई पोलीस ठाणे ,शनिशिंगणापूर पोलीस ठाणे ,शेवगाव पोलीस ठाणे आणि नेवासा पोलीस ठाणे यांच्या मदतीने वेळीच नाकाबंदी करून पाथर्डी पोलीस ठाणे यांनी गुन्ह्यातील दोन आरोपींना सुनिल एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे ,अंबादास सदाशिव पालवे यांना शिताफीने पकडले तसेच गुन्ह्यातील आरोपी यांचे ताब्यातील फॉर्च्युनर गाडी एम एच १६ बी झेड 31 31 भरधाव वेगाने तिसगाव येथून मिरी ,माका, देडगाव, कुकाणा , नेवासा मार्गाने पळून जात असताना 

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने पाथर्डी पोलीस निरीक्षक यांच्या  पथकासोबत त्या फॉर्च्युनरचा  अतिशय थरारक पाठलाग करत नेवासा पोलीस पथकाने फॉर्च्युनर गाडी मधून आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे अनिल एकनाथ पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे, यांना ताब्यात घेतले तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या पथकाने अक्षय संभाजी पालवे यास ताब्यात घेतले  घेतले. 

मयत पालवे यांचा मृतदेह पोस्टमार्टसाठी जिल्हा रुग्णालयात आणला आहे. याप्रकरणी  पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम शनिवारी रात्री  उशिरापर्यंत सुरु होते.

Post a Comment

0 Comments