चोरटयांनी माय- लेकीला लुटले

चोरटयांनी माय- लेकीला लुटले 

वेब टीम नगर : शहरातील चांदणीचौकात गुरुवार (दि.१६) सायंकाळी बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठी उभ्या असणारे आई-मुलीला चार चोरट्यांनी मारहाण करीत लाखो रुपयांना लुटण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, पल्लवी प्रथमेश चिंचले या व आई त्यांच्या नातेवाईकांकडे मोडनिंब (ता. जि. सोलापुर) येथे जाण्याकरीता चांदणी चौक (सोलापूर रोड, अहमदनगर ) येथे उभे होत्या. यावेळी त्यांना अनोळखी इसमाने त्याचे विनानंबरचे मोटारसायकलवर बसवून वाळुंज शिवारात रेल्वे लाईनजवळ रोडच्या आडबाजुला घेऊन त्यांना बांबुने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. दुखापत करून बळजबरीने १ लाख ४२ हजार ५०० रुपयेचा सोन्याचे दागिने , रोख रक्कम, मोबाईल चोरुन नेले आहे.

या पल्लवी प्रथमेश चिंचले (रा. सुर्या पार्क, आर टी ओ ऑफिसजवळ नाशिक ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु..र.न. 247/2022 भा.दं.वि.कलम 394,34 प्रमाणे गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई के एस साळुंके हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments