जिल्ह्याचा १०वी चा निकाल ९६.५८ टक्के

जिल्ह्याचा १०वी चा निकाल  ९६.५८ टक्के 

जिल्ह्यात मुलीच अव्वल 

वेब टीम नगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळाने मार्च २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १७) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. नगर जिल्ह्याचा निकाल ९६.५८ टक्के लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.८२ टक्के तर मुलांचा ९५.६४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात अकोले तालुक्याचा सर्वाधिक ९८.३६ टक्के निकाल लागला आहे. या निकालात पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेत (९७.७४ टक्के) विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्याचा टक्के तर नगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर ९६.५८ टक्के आहे.

नगर जिल्ह्यात ६८ हजार ९०१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्या पैकी ६६ हजार ५४९ विद्यार्थी पास झाले आहेत. तर २ हजार ३५२ विद्यार्थी नापास झाले आहे. पास होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९७.८२ टक्के तर मुलांचे प्रमाण ९५.६४ टक्के एवढे आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापन तसेच आठवी आणि नववीवीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला होता. या वर्षी कोरोनाची लाट ओसरल्यावर शाळा सुरु झाल्या व त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१७) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यात अकोले तालुक्याचा सर्वाधिक निकाल

या परीक्षेच्या निकालात अकोले तालुका प्रथम क्रमांकावर आहे. अकोलेचा निकाल ९८.३६ टक्के लागला आहे. जामखेड - ९६.४४, पारनेर - ९७.७६, नगर - ९७.२६, नेवासा - ९६.०७, अकोले - ९३.८७. - कर्जत - ९६.७१, कोपरगाव - ९५.०३, पाथर्डी ९५.५३, राहता - ९६.१२, राहुरी - ९५.६१, संगमनेर - ९७.१३, शेवगाव - ९७.०९, श्रीगोंदा - ९७.२५, श्रीरामपूर ९५.०७ टक्के निकाल लागला आहे.

Post a Comment

0 Comments