दहावीचा निकाल ९६.९४ टक्के, राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

दहावीचा निकाल ९६.९४ टक्के, राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

वेब टीम मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी, परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केले आहे.

दहावी परीक्षेत राज्यात एकूण ११२ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले

राज्यात परीक्षेत तोतयेगिरी (डमी) करणारा १ विद्यार्थी, प्रत्यक्ष गैरप्रकार करताना पकडलेले विद्यार्थी ७९, परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासताना परीक्षकांना किंवा नियामकांना आढळलेले ३२ विद्यार्थी आहेत. यात धमकी, विनंती, ओळखीचं चिन्हं पेपरवर लिहिणे, उत्तर पत्रिकेचं पान फाडणे अशा प्रकारांचा समावेश आहे. या प्रकरणांची चौकशी होते. असे एकूण ११२ प्रकार परीक्षेत आढळून आले.

राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के, तर १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के

राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे. १ ते १० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या एक आहे. पाच शाळांमध्ये १० ते २० टक्के निकाल लागला. ४ शाळांमध्ये २०-३० टक्के निकाल लागला आहे. १८ शाळांमध्ये ३०-४० टक्के, ३८ शाळांचा निकाल ४०-५० टक्के, ४१ शाळांचा निकाल ५०-६० टक्के निकाल, १२३ शाळांचा निकाल ६०-७० टक्के लागला. याशिवाय ७०-८० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२१, ८०-९० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १३३०, ९०-९९.९९ टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या ८ हजार ८०१ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२ हजार २१० इतकी आहे.

Post a Comment

0 Comments