धूम स्टाईलने मोबाईल हिसकावणारे दोघे सराईत गजाआड

धूम स्टाईलने मोबाईल हिसकावणारे दोघे सराईत गजाआड 

वेब टीम नगर : दि.३१ मे २०२२ रोजी मिलन चौक पारनेर येथे घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असतांना स्प्लेंडर दुचाकीवर निळ्या व काळ्या रंगाचे शर्ट घातलेले अज्ञात दोनजणांनी जवळ येऊन हातातील १५ हजार रु. किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेऊन गेले,कोमल दत्तात्रय जाधव (रा.करदी, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात  गु.र.नं. ४०९/२०२२ भादविक ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.दरम्यान पोनि श्री.कटके यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली सदरील गुन्हा हा अब्दुल खान(रा. छत्रपती नगर, तपोवन अहमदनगर) याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पोनि/श्री.अनिल कटके यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या.पोलिस पथकाने छत्रपती नगर,तपोवन येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन आरोपी अब्दुल खान हा तपोवन येथील छत्रपती नगर येथे राहतो अशी माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे घराचे आजुबाजूस सापळा लावून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. 

 आरोपीकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन कसुन चौकशी केली असता, त्याने गुन्हा त्याचा साथीदार  सुखचेन केसरसिंग ( रा. छत्रपती नगर, तपोवन) याच्यासह केल्याची कबुली दिली.दिलेल्या माहितीचे आधारे आरोपीचा साथीदार सुखचेन केसरसिंग यास ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेला १५ हजार रु. कि. चा व्हिवो कंपनीचा मोबाईल काढून दिल्याने, तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक,श्री.अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण विभाग व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील पोसई सोपान गोरे,पोहेकॉ  संदीप पवार,पोना शंकर चौधरी,रवि सोनटक्के,पोकॉ योगेश सातपुते,मेघराज कोल्हे व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पुढील तपास  पारनेर पोलीस हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments