पुणे ए.टी.एस.ची मोठी कारवाई

पुणे ए.टी.एस.ची मोठी कारवाई 

वेब टीम पुणे : दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. पुणे दहशवाद विरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे अटक केली आहे. इनामुल हक असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण जुनैद मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांच्या संपर्कात होता. आज पुणे न्यायालयात त्याला हजर करणार आहेत.

इनामुल हक हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद  या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वीच अटक केली होती. जुनैद नंतर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या या तरुणालाही पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सोशल मीडियावरुन बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता.


Post a Comment

0 Comments