कराचीत हिंदू मंदिराची तोडफोड

कराचीत हिंदू मंदिराची तोडफोड 

वेब टीम कराची : पाकिस्तानमध्ये कराचीत एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी मंदिराची तोडफोट करून मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची विटंबनाही केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहे.

पुजाऱ्यांच्या घरावरही हल्ला

एएनआयच्या वृत्तानुसार, बुधवारी काही हल्लेखोरांनी मंदिरासोबत पुजाऱ्यांच्या घरावरही हल्ला केला. तसेच मंदिरातील हनुमानाच्या मुर्तीचीही विटंबना केली. काही दिवसांपूर्वीच पुजारींनी या मुर्ती मंदिरात आणल्या होत्या. नव्याने बांधण्यात येणाऱ्या मंदिरात या मुर्त्या ठेवण्यात येणार होत्या. तोडफोडीनंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

अल्पसंख्याक समुदायावर हल्ले

कोरंगी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच ते सहा अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश केला आणि तोडफोड करून पळ काढला. गेल्या ऑक्टोबरमध्ये सिंधमधील कोत्री भागात एका ऐतिहासिक मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली होती. मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे की पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे अल्पसंख्याक समुदायावर हल्ले केले जात आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, त्यामुळे देशातील मानवाधिकारांची नोंद खालच्या पातळीवर पोहोचली आहे.

Post a Comment

0 Comments