मोहंमद पैगंबराबद्दल अनुदार वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या प्रतिमेचे नगरशहरात दहन
वेब टीम नगर : भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यांचे गंभीर परिणाम आखाती देशात पाहायला मिळाले. हे प्रकरण थेट आता 57 सदस्यीय मुस्लिम देश संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन पर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणामुळे ओआयसीने संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे परिणाम दूरगामी पाहायला मिळाले.
अहमदनगर शहरातही याचे पडसाद उमटले असून नुपूर शर्मा यांच्या प्रतिमेचे दहन मुस्लिम संघटनेच्या वतीने करण्यात आले. नगर औरंगाबाद रोड वरील कोठला स्टँड चौक परिसरात नुपूर शर्मा यांच्या वक्तवयचा निषेध करत पुतळ्याचे दहन करण्यात आले.
मुर्दाबाद मुर्दाबाद नूपुर शर्मा मुर्दाबाद या घोषणा देत कोटला स्टँड ते कोंडेमामा चौकापर्यंत नुपूर शर्मा यांच्या प्रतिमेच्या निषेध मोर्चा काढण्यात आला त्यानंतर पुन्हा कोठला स्टँड चौक परिसरातील पुतळ्याला चपला मारत पुतळ्याचे दहन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेबांन जहागीरदार यांच्यासह अनेक मुस्लीम बांधव यावेळी उपस्थित होते
0 Comments