दिल्लीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
वेब टीम नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीनं ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडित मुलीला आमिष दाखवून कारखान्यात घेऊन जात हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत सीलमपूर परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मोहम्मद शाजिद असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील बेगूसराईजवळील नरवाडा गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी ९ वर्षीय पीडित मुलगी रस्त्यावर खेळत होती. दरम्यान आरोपीनं तिला आमिष दाखवत कारखान्यात घेऊन गेला. याठिकाणी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सीलमपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच सीलमपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पीडित मुलीला जेपीसी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सीलमपूर पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत सीलमपूर भागातून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, “आरोपी शाजिद हा पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरातील एका कंपनीत काम करतो. तो पीडित मुलीच्या ओळखीचा आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी रस्त्यावर खेळत होती. त्यानंतर आरोपीनं आमिष दाखवत पीडितेला कारखान्यात घेऊन जात बलात्कार केला आहे. पीडित मुलगी लहानपणापासून मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सीलमपूर पोलीस करत आहेत.
0 Comments