माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर जिल्हा राज्यात अव्व्लस्थानी

माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर जिल्हा राज्यात अव्व्लस्थानी

जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा पर्यावरण दिनी शासनाच्या वतीने होणार सन्मान

वेब टीम नगर : माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. माझी वसुंधरा अभियान २.० मधील अहमदनगर जिल्ह्याची  कामगिरी सर्वोत्तम झाली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी  अहमदनगर जिल्ह्यातील वाघोली ता, शेवगाव ,गणोरे ता, अकोले, मढी ता. पाथर्डी सोनई ता. नेवासा मिरजगाव ता. कर्जत या ग्रामपंचायतीने  केलेल्या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व  सुरेश शिंदे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे.

  5 जुन 2021  पर्यावरण दिनापासुन माझी वसुंधरा अभियान टप्पा.2 हे अभियान सुरु झाले.यामध्ये अहमदनर जिल्हयातील 574 ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता.या ग्रामपंचायतीमध्ये  मोठया प्रमाणात   सामाजिक माध्यमाव्दारे जनजागृती,विविध स्पर्धाचे आयोजन, माहीती शिक्षण सवांदाचे उपक्रम राबवुन  माझी वसुध्ंरा  अभियानाबाबत  वर्षभ्र जनजागृती करण्यात आली.

राज्यस्तरावरुन 574 ग्रामपंचायती पैकी 77 ग्रामपंचायतीची  प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.त्यापैकी  जिल्ह्यातील वाघोली ता, शेवगाव ,गणोरे ता, अकोले, मढी ता. पाथर्डी सोनई ता. नेवासा मिरजगाव ता. कर्जत या ग्रामपंचायतीने राज्यात अव्व्ल क्रमांक मिळविला असुन संबधित ग्रामपंचायतीचे सरपंच/ग्रामसेवक/ग्रामस्थ् यांचेसह जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,उपमुख्य  कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवार, ५ जून, २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, उप मुख्यमंत्री अजित पवार ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मंत्री, नगर विकासमंत्री , ग्राम विकासमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री  आणि पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री उपस्थितीत टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments