लीलावती रुग्णालयातील वायरल व्हिडीओ वरून शिवसेनेने उपस्थित केले प्रश्न

लीलावती रुग्णालयातील वायरल व्हिडीओ वरून शिवसेनेने उपस्थित केले प्रश्न

रुग्णालय प्रशासनास धरलं धारेवर; खरोखर एमआरआय झाला आहे का? असा सवाल

 वेब टीम मुंबई : नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची दिसत आहे. कारण, तुरूंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास धारेवर धरलं आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांच्यासह आज शिवसेना नेते आज लिलावती रुग्णालयात जाऊन धडकले. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

नवनीत राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना व्हीडीओ शुटींग आणि फोटो कसे काढले गेले? रुग्णलयाचे नियम सर्वांना समान हवेत. त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत. असं म्हणत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं आहे.

रुग्णालयात फोटोग्राफी आणि शुटींग करण्यासाठी कोणी दबाव आणला आहे का? याचा तपास झाला पाहिजे. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमांना दिली.

Post a Comment

0 Comments