४ जुगार अड्ड्यावर छापा,४ आरोपींना अटक, ८०७९ रोख रक्कम जप्त
वेब टीम नगर : कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , अहमदनगर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात AMT बस स्थानकाजवळ,शहरातील पुणे स्वस्तिक बस स्थानकाच्या शेजारी स्वास्तिक चौकात,
शहरातील बुरुडगाव रोड येथील चाणक्य के चौकात सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या जवळ वाशिंग सेंटर जवळ सारस नगर रोड,शहरातील महात्मा फुले चौक मार्केट यार्ड येथील भितीच्या आडोशाला लोकांकडून पैसे घेवून त्यांना आकडयाच्या चिठया देवून कल्याण मटका नावाचा हारजितीचा जुगार खेळवीतो आहे.
या चार ठिकाणी गोपनीय पद्धतीने जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली होती .
पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल /चालक बाबासाहेब तागड ,पोलीस नाईक गणेश धोत्रे,पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहकले, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार,पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे या पथकाने ७/५/२०२२ रोजी १४/४५ छापा टाकला असता.
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात AMT बस स्थानकाजवळ भितीच्या आडोशाला छापा टाकला असता आरोपी नामे दिलीप गोरख टेमकर वय २९ वर्ष रा घोडेगाव दिपक हॉटेल जवळ ता नेवासा जि अ नगर त्याचे कब्ज़ात कल्याण मटक्याची रोख रक्कम ७४० / - रु (२) १५/३० वाजता महात्मा फुले चौक मार्केड यार्ड मागील गेट समोर वॉशींग सेंटर जवळ सारसनगर रोड भितीच्या आडोशाला आरोपी नामे नवनाथ महादेव नागरगोजे वय ३१ रा ता पाथर्डी चिंचपुर पांगुळ गाव ता पाथड़ी जि अ नगर ह.रा. सारसनगर चिपाडे मळा शहाने वकील यांचे जवळ अहमदनगर असे त्याची अंगझडती घेतली असता ११७० / - रु रोख रक्कम मिळून आली (३) १३/४५ वा बुरुडगाव रोड चाणक्य चौकात सार्वजनिक स्वछता ग्रहा जवळ भितीच्या आडोशाला आरोपी नामे निलेश जनार्धन जरबंडी वय ३० रा नालेगाव दातरंगे मळा नालेगाव अहमदनगर त्याच्या कब्जात खालील ७१० / - रु रोख रक्कम मिळाली १३/४५ वा खात्री करून छापा टाकला असता तेथे एक इसम चाणक्य चौकात सार्वजणीक स्वछता ग्रहा जवळ भितीच्या आडोशाला आरोपी नामे निलेश जनार्धन जरबंडी वय ३० रा नालेगाव दातरंगे मळा नालेगाव अहमदनगर अंगझडतीत कब्जात रोख रक्कम ५४८० / - रु रोख रक्कम .
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,पोलीस हेडकॉन्स्टेबल /चालक बाबासाहेब तागड ,पोलीस नाईक गणेश धोत्रे,पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे,पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहकले,पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे,पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार,पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे या पथकाने सदरची कारवाई केली आहे.
0 Comments