माध्यमिक शिक्षकांच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

माध्यमिक शिक्षकांच्या सभेत  गोंधळ, धक्काबुक्की

वेब टीम नगर : जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडले. गोंधळ, आरडाओरडा करत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे. हमरीतुमरी धक्काबुक्की करणे, ध्वनिक्षेपकाची मोडतोड, परस्परांची लायकी काढणे, असे प्रकार घडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी अखेर विषयांचे वाचन न करताच सभा मंजूर-मंजूरच्या घोषणा देतसभा आटोपती घेतली 

सत्ताधारी मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे आणि विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे, अप्पासाहेब शिंदे यांच्याशी सोसायटीतील विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा अनेकदा रंगला. 

सोसायटीची ७९ वी वार्षिक सभा, संस्थेचे अध्यक्ष सुरेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे दोन वर्षे सभा ऑनलाईनपद्धतीने झाली होती. काल मात्र प्रत्यक्ष सभा झाली  . त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडले होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी झडत होत्या . सभासद शिक्षकांची उपस्थिती कमी असली तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. सभेत पोलिस बंदोबस्तही मागवण्यात आला होता. 

सभेत भाडेतत्त्वावर डाटा सेंटरची उभारणी, जागा खरेदी, नोकर भरती, मयत निधी, संस्थेचा कारभार ऑनलाइन झाला की नाही, मागील इतिवृत्तात सभासदांनी मांडलेल्या मुद्यांचा समावेश नसणे, सभा कायदेशीर की बेकायदा असे अनेक विषय गाजले. डाटा सेंटर त्रयस्थ संस्थेच्या मदतीने भाडेतत्त्वावर उभारणीस बाबासाहेब बोडखे यांनी विरोध नोंदवला.

 सभासद सुनील दानवे, सुनील पंडित, मारुती भालेराव, आत्माराम दहिफळे, देविदास पालवे, संजय फटांगरे, सुनील वाळुंज, भाऊसाहेब काळे, किशोर मुथा आदी चर्चेत सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments