ट्रक चालकास मारहाण करून लुटले

ट्रक चालकास मारहाण करून लुटले 


वेब टीम नगर
: औरंगाबाद महामार्गावरील नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारात इस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी पहाटेच्या सुमारास  ही घटना घडली.  मारहाणीत जखमी झालेल्या ट्रक चालक विठ्ठल रमेश काकडे (वय 30 रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) असे नाव आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, ३ चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल काकडे हे त्यांच्याजवळ  ट्रक (एमएच 16 सीए 0533) घेऊन अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाने आळेफाटा येथे जात असताना खोसपुरी शिवारात त्यांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी थांबविले. ट्रकमध्ये घुसून चोरट्यांनी  काकडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी ट्रकमध्ये झोपलेले मित्र गौरव गौतम गलबले यांनाही मारहाण करण्याची धमकी दिली. काकडे यांच्या गळ्यास कोयता लावून त्यांच्या खिशातील 27 हजार रूपयांची रक्कम चोरट्यांनी घेऊन पळून गेले, या ट्रक चालक विठ्ठल रमेश काकडे (वय 30 रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Post a Comment

0 Comments