सापडलेलं पैश्याच पाकीट प्रामाणिकपणे केले परत

सापडलेलं पैश्याच पाकीट प्रामाणिकपणे केले परत 

वेब टीम नगर : जगात प्रामाणिकपणा कुठे आहे, असे सहज बोललं जात, पण तो प्रामाणिकपणा  असा  अहमदनगर शहरातील कल्याण रस्त्याने एकजण पायी जात होता. या दरम्यान त्याला रस्त्यावर पैशाचे पाकीट  सापडले, ते पैशाचं पाकीट  त्या व्यक्तीने कोतवाली पोलिस ठाण्यात दिले. कोतवाली पोलिसांनी कर्तव्याची जाण ठेवून पोलिसिंग करून संबंधित पैशाचं पाकिट मूळ मालकास परत देण्याची कौतुकास्पद कामगिरी कोतवाली पोलीसांनी केली आहे. या चांगल्या  कामगिरीमुळे कोतवाली पोलिसांचे पोलिस वर्तुळासह सामाजिक संघटनांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.२० मे २०२२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ओंकार संतोष पवार (रा विद्याकॉलनी कल्याणरोड अहमदनगर) हे कल्याण रोडने पायी जात असताना त्यांना रोडच्या बाजूला एक पैशाचं पाकीट पडलेले दिसले. श्री पवार यांनी माणुसकीच्या नात्याने व आपले सामाजिक कर्तव्य ते पैशाचे पाकिट घेऊन कोतवाली पोलीस ठाणे गाठले. ते पैशाचे पाकिट पोनि संपतराव शिंदे यांच्या दिलं. पोनि श्री शिंदे यांनीत्या पैश्याच्या  पाकीटाची  तपासणी  केली, या दरम्यान पैशाचं  पाकीट हे अनिकेत चंद्रकांत ताठे (रा. टिळकरोड अहमदनगर) याचे असल्याचे निदर्शनास आले.

 यावेळी पोनि श्री शिंदे यांनी कोतवाली पोलिस कर्मचा-यांना मूळ मालकाचा शोध घेऊन त्यास पैशाचं  पाकिट परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोतवाली  पोलिसांनी सापडलेल्या पैशाचं  पाकीट मालक श्री ताठे शोध घेऊन त्यास कोतवाली पोलिस ठाण्यात बोलावून पैशाच्या   पाकीटातील रोख रक्कम व विविध बँकेच्या एटीएम कार्डसह परत केले.

यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे, पोसई दुर्गे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे मपोना वैशाली पटारे, पोकाँ सुजय हिवाळे, पोकाँ तानाजी पवार, मपोकाँ पल्लवी रोहकले आदि उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments