अवैद्य धंद्याचे फेसबुक लाईव्ह दाखवणाऱ्या संदीप भांबरकर यांना बेदम मारहाण

अवैद्य धंद्याचे फेसबुक लाईव्ह दाखवणाऱ्या संदीप भांबरकर यांना बेदम मारहाण


वेब टीम नगर : अवैद्य धंद्याचे फेसबुक लाईव्ह करून जनते समोर मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांना बेदम मारहाण गेल्या काही दिवसा पासून  संदीप भांबरकर यांनी पोलीसांना फेसबुकच्या माध्यमातुन आपले मत मांडले होते.की नगर शहरातील अवैद्य धंदे बंद करा नाही तर फेसबुक लाईव्ह द्वारे नगरकरां समोर हे अवैध धंदयांचे लाईव्ह  मांडणार आज संदिप भांबरकर यांनी शहरातील एका अवैद्य धंद्यावर जाऊन फेसबुक लाईव्ह केले त्या वेळी अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांच्या लक्षात आल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांना चांगलीच मारहाण केली आहे.

त्यानंतर त्यांच्यावर तोफखाना पोलिसात  गुन्हा दाखल  

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरातील एका पत्त्याच्या क्लबचा फेसबूक लाईव्ह करून नगर शहरातील अवैद्य धंदे यांबाबत पोलखोल करणाऱ्या संदीप भांबरकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तोफखाना परिसरातील एका महिलेने संदीप भांबरकर  यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.

संदीप भांबरकर यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत त्यांनी एका घरात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. तसेच त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

महिलेच्या फिर्यादी नुसार तोफफखाना पोलीस स्टेशनमध्ये संदीप भांबरकर  यांच्याविरोधत भादवि कलम 394,354ब ,452,504,506, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments