एकाच कुटुंबातील ५ तरुणींचा भाटघर धरणात पडून मृत्यू

एकाच कुटुंबातील ५ तरुणींचा भाटघर धरणात पडून मृत्यू 

वेब टीम पुणे :  जिल्ह्यामध्ये आज दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. भोर तालुक्यातील भाटघर धरणात एकाच कुटुंबातील पाच तरुणी आणि खेड तालुक्यातील चासकमान धरणात चार शाळकरी मुलांचा अशा एकूण नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. भाटघर धरणात पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणी या एकाच कुटुंबातील आहेत. 

खुशबू लंकेश रजपूत (वय 19), मनिषा लखन रजपूत (वय 20), चांदणी शक्ती रजपूत (वय 21), पूनम संदीप रजपूत (वय 22) मोनिका रोहित चव्हाण (वय 23) अशी या पाच जणींची नावं आहेत. या महिला त्यांच्या नातेवाईकांसोबत नर्हे गावातील त्यांच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. घरघुती कार्यक्रम संपल्यावर या सर्वजणी शेजारीच असलेल्या भाटघर धरणाजवळ फिरायला गेल्या होत्या. 

या पाच तरूणी भाटघर धरणातील पाण्यामध्ये उतरल्या. पण त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या पाचही तरूणी बुडाल्यानंतर त्यांचे सर्व साहित्य धरणाच्या काठावर तसेच पडून होतं. या पाचपैकी तीन तरुणींचा मृतदेह सापडला असून उर्वरित दोघींच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. 

दुसऱ्या एका घटनेमध्ये भोर खेडमधील चासकमान धरणात चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सह्याद्री स्कुलचे विद्यार्थी शिक्षकांसह चासकमान धरणाच्या जलाशयात पोहायला गेले होते. कमरेएवढ्या पाण्यात असताना पाण्याची एक मोठी लाट आली आणि त्यामध्ये सहा ते सात विद्यार्थी ओढले गेले. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यावळी चार विद्यार्थी बुडाले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. परीक्षित अग्रवाल, रितीन डीडी, तनिशा देसाई आणि नव्या भोसले असं या विद्यार्थ्यांची नावं आहेत. गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. या दोन्ही घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Post a Comment

0 Comments