परप्रांतीय तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

परप्रांतीय तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

वेब टीम श्रीगोंदा : माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा येथे घडली आहे.श्रीगोंद्यातील रहिवासी व  इयत्ता १० वी च्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला त्यांच्या शेजारीच मजुरीचे काम करणाऱ्या छत्तीसगड येथील परप्रांतीय मुलाने अश्लील हावभाव करत तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला.सदर प्रकार हा साधारण ६ महिन्यांपासून चालू होता.

त्या दिवशी त्याने थेट तिला मिठी मारून तिचा विनयभंग केला.याबाबत पीडित मुलीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये त्या नराधमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंद्यातील रहिवाशी असलेल्या पीडित मुलीला.. तिच्या चुलत भावाकडे काम करण्यासाठी आलेला छत्तीसगड येथील इसम सतत घरापासून जाता-येता तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत, हसून खुणवत असे.. वारंवार होणाऱ्या या घटनेबाबत मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. 

यावर त्यांनी नमूद व्यक्तीला समजावून सांगितले. मात्र, त्याचे  कृत्य थांबले नाही.दि.७ मे 2022 रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली असता, तिला त्या व्यक्तीने पाठीमागून मिठी मारत, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.यानंतर पीडित मुलीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन नमूद इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या परप्रांतीय इसमावर भादवि कलम ३५४,५०९ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे ८ व १२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Post a Comment

0 Comments