माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

 
माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव(प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सेवा संस्थेचे माजी चेअरमन व ज्ञानेश्वरचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे यांचा ६८ वा अभिष्टचिंतन सोहळा संत रोहिदास महाराज प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांच्या पुढाकाराने उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी नेवासा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, राजेंद्र मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पोपट गोयकर, भास्कर तांबे, गंगाधर तांबे, निलेश कोकरे, पत्रकार युनूस पठाण, मच्छिंद्र मुंगसे, भाऊराव मुंगसे आदी मान्यवरांनी बनसोडे यांचा सन्मान केला. 

 यावेळी उपस्थित मान्यवरांनी लक्ष्मणराव बनसोडे यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला. बनसोडे यांनी सुरुवातीला अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपली वाटचाल सुरू केली. त्यानंतर सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी सुरु केले. गोरगरिबांच्या समस्या असतील, प्रापंचिक तंटे, बांधावरील तंटे आदी समाजउपयोगी काम त्यांनी केलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. परिसरामध्ये आण्णा या नावाने त्यांना सर्वजण संबोधतात.

Post a Comment

0 Comments