नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अकोल्यात 'मन कि बात' चे आयोजन

नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अकोल्यात 'मन कि बात' चे आयोजन 

वेब टीम अकोले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अकोले भाजप कार्यालयात मन की बात कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते .यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड माजी आमदार वैभव पिचड,भाजप गट नेते जालिंदर वाकचौरे,शिवाजी धुमाळ,भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे,नगर अध्यक्षा सोनाली नाईक वाडी,रेश्मा गोडसे,कल्पना सुरपुरीया,युवा अध्यक्ष राहुल देशमुख,नगरसेवक हितेश कुंभार,अकोले तालुका एज्युकेशन संस्था अध्यक्ष सुनील दातीर,सचिव सुधाकर देशमुख उपस्थित होते.

प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड म्हणाले देशाचे नाव विश्वात नेणारे विश्व गुरू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र  जी मोदी होय.आपल्या देशाचे भाग्य की आपल्याला नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान लाभले आहेत देशात यापुढे नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य असेल यात तिळमात्र शंका नाही.तर जालिंदर वाकचौरे यांनीही देशाच्या प्रगतीचा आलेख सांगितला,सोनाली नाईकवाडी यांनी देशात महिलांना सन्मान देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.हे सरकार मोदीच्या नेतृत्वाखाली  जगाला दिशा देण्याचे काम करीत आहे. 

Post a Comment

0 Comments