आगामी जि.प.पंचायत समिती निवडणूका महाविकास आघाडीच जिंकेल : प्रा.शशीकांत गाडे

आगामी जि.प.पंचायत समिती निवडणूका महाविकास आघाडीच जिंकेल : प्रा.शशीकांत गाडे

पोखर्डी येथील ३ कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण सोहोळा 

वेब टीम नगर : आता काळ बदलला आहे पूर्वीचे धाकदपटशा दाखवण्याचे दिवस संपले.आता जनता हुशार झाली आहे.या मतदारसंघातील जि प पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गेल्या १५ वर्षापासून आम्हाला 75 टक्के मतदान होत आहे.आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा महा विकास आघाडीचे जिंकेल असा विश्वास व्यक्त करतांना पोखर्डी येथे झालेल्या जवळ जवळ  साडे तीन कोटींच्या विकास कामांचे आज लोकार्पण, भूमिपूजन होत आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत विजय आपलाच आहे असा विश्वास  शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला.

पोखर्डी येथील मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या विशेष निधीतून  ३ कोटी 66 लाख 50 हजार रुपयांच्या  विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजन प्रसंगाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून प्रा.शशिकांत गाडे बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे या उपस्थित होत्या, तर व्यासपीठावर माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सिताराम काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदासजी कर्डिले, धनगर वाडी चे सरपंच किशोर शिकारे, किशोर बेरड, भाऊ कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ झिने ,दत्तात्रय ससे डॉ.चौरे, उपसरपंच विजय कराळे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुरीच्या माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांच्या हस्ते झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.पुढे बोलताना शशिकांत गाडे म्हणाले यापूर्वी या मतदारसंघात कामे केवळ कागदावरच होती.आम्ही वर्तमानपत्रातून या कामाच्या जाहिराती पाहत होतो. कामांची बिले निघत होती.मात्र प्रत्यक्ष रस्ते झाले ते मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारकीर्दीत.त्यापूर्वीच्या काळात विविध सोसायट्यांच्या निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्याला हाताशी धरून आमची मते बाद करून सोसायट्या ताब्यात घेण्याचे काम मागच्या आमदारांनी केले.  या राजकारणात आम्हाला आठ सोसायटी गमवावा लागल्या. या मार्केट कमिटीच्या निवडणुका असोत वा अन्य सोसायट्यांच्या विरोधी पॅनलच्या उमेदवारांना दमदाट्या  केलय जायच्या  अरे,तुम्ही जर पंचवीस वर्षे या मतदारसंघाचे आमदार होतात, जनतेची विकास कामे केली असती तर दमदाटी करण्याची वेळ आली नसती.दुधवाल्यांचे आमदार म्हणून एकीकडे भाषणं करतात दुसरी कडे दूध संघाची जागा विकतात , मार्केट कमिटीचे वाटोळं यांनीच केलं, सर्वसामान्यांच्या हातातून साखर कारखाना यांनीच हिसकावला असा टोला मारून आगामी काळात मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आम्ही पॅनल उभे करणार असून ते नक्की निवडून येईल आणि नगर राहुरी मतदार संघात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत प्राजक्त दादा तनपुरे हेच आमदार राहतील अशी ग्वाही प्रा.गाडे यांनी दिली. 

मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांना विजय केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानते.त्यांच्या विशेष निधीतून इथल्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली दादांकडे सहा महत्त्वाच्या राज्यमंत्री पदाची खाती असून त्यांच्यावरील कामाचा व्याप वाढला आहे.त्यामुळे त्यांना आपणाशी पूर्वीसारखा संपर्क साधता येत नाहीये, याचे आपण वाईट वाटून न घेता यावेळी दाखवला तसाच विश्वास आगामी काळातही दाखवावा, आपल्या भागाचा विकास करून घ्यावा. असे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे म्हणाल्या  

प्रास्ताविकात बोलताना सरपंच रामेश्वर निमसे म्हणाले,गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत  कोरोनाच्या महामारीच्या काळात गावात कुठलाही उद्घाटन सोहळा पार पडला नाही. मात्र विकास कामात खंड पडू दिला नाही. त्याच पूर्ण झालेल्या विकास कामांचा आज लोकार्पण सोहळा होत आहे. आणि प्रस्तावित विकास  कामांचे भूमिपूजन याठिकाणी करण्यात आले आहे.मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी भरघोस निधी दिल्याने ग्रामपंचायत  इमारत व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले.पोखर्डी गावात ३ डीपी बसविण्यात आले असून, या व्यतिरिक्त रस्ता कॉंक्रिटीकरण, वाचनालय, काळामाथा येथे चार हायमॅक्स लाईट बसविणे, दलित वस्तीत बंदिस्त गटारे बांधणे,गावठाण्यात स्ट्रीट लाईट बसविणे, ढवळे वस्ती प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्त करणे ,गावठाण्यात  वाडीवस्तीवर राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत पाईपलाईन टाकणे,आदी विकास कामे करण्यात आल्याचे रामेश्वर निमसे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सीताराम काकडे, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, माझी जी प सदस्य रघुनाथ झिने आणि ग्रामस्थ भाऊसाहेब आल्हाट  यांची समयोचित भाषणे झाली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य शिवाजी ढवळे,स्वाती चौरे,बाळासाहेब कराळे, जगन्नाथ निमसे,  मगर सर,  केशव बेरड, राम कदम,युसूफ भिंगारदिवे सचिन पालवे ,संजय मगर, विजय दानी, अक्षय रोहिदास कर्डिले, राजेंद्र मगर, ज्ञानेश्वर महाराज, मुबारक पठाण ,सोमनाथ हारेर ,भीमराज मोकाटे ,सर्जेराव मते ,संतोष पठारे, संजय प्रभूणे , अशोक विरकर ,अण्णासाहेब मगर ,दत्तू रोकडे, दत्तात्रय जरे,  रामदास ससे ,विलास काळे ,विष्णू जरे, अंकुश आव्हाड,, अमित आव्हाड ,धर्मा आव्हाड, सरपंच प्रवीण जावळे ,राम वारुळे ,मुकुंद गवळी, मिठू ढवळे, नंदू वारुळे ,रविराज निमसे ,अनुसर हरी निमसे, रामनाथ निमसे ,निलेश कराळे ,शिवम निमसे ,सोपान राऊत ,गणेश घाडगे, दत्तात्रय जाधव- ,अंबादास ढवळे ,मीननाथ कराळे ,संजय कराळे ,भीमराज जावळे ,बच्चन गवळी, शिवाजी निमसे ,रोहिदास निमसे ,नंदू निमसे, अरुण जावळे, बापू राजगुरू ,सोपान राऊत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश भगत यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव ढवळे यांनी केले.  स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments