धर्मान्तर करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करावा लागेल : माजी मंत्री मधुकर पिचड

धर्मान्तर करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करावा लागेल : माजी मंत्री मधुकर पिचड 

वेब टीम अकोले : आदिवासींच्या,चाली रिती, परंपरा, कला,संस्कृती ची जपवणूक करण्याची आवश्यकता असून काही संघटना आदिवासी समाजाची दिशाभूल करून अल्प शिक्षित,आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासींचे धर्मांतर करीत आहे. श्रद्धा,रीतिरिवाज,पूजा परंपरा पाळणाऱ्यानाच आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे .तर संघटित होऊन धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तींचा बीमोड करावा लागेल असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड यांनी राजूर येथे बोलताना काढले .

 राजूर येथे जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र यांच्या वतीने क्रांतिवीर राघोजी भांगरे आदिवासी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जनजाती कल्याणचे प्रांत सचिव शरद शेळके, प.पू.महामंडलेश्वर महंत देवबाप्पा महाराज,मध्यप्रदेश चे कैलाशजी अलियार,भाजप अनुसूचित मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड,मंगलदास भवांरी माजी सरपंच सौ.हेमलता पिचड  उपस्थित होते.सकाळी ९वाजता राजूर येथे आदिवासी कला,संस्कृतीचे दर्शन व्हावे म्हणून श्री राम, श्री,हनुमान  श्री शंकर या  देवतांची  भव्य मिरवणूक काढण्यात आली.क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्यांप्रतीमेचे पूजन करण्यात आले . प्रास्तविक  करताना शरद शेळके यांनी  आदिवासी समाजाचे मोठ्याप्रमाणात मुस्लिम ,ख्रिश्चन धर्मात धर्मांतर होत असून धर्म,संस्कृती परंपरा वाचविण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.स्वातंत्र्य पूर्व काळात ५०० संस्थाने जनजाती कडे होती जव्हार ची सत्ता मुकणे राजे यांचेकडे ६३२ वर्षे होती दसरा उत्सवाची ७०० वर्षाची परंपरा सोडून ख्रिसमस ला कवटळ्याचे का ? आदिवासी  लग्न पत्रिकेत  ख्रिश्चन धर्मियांचे आशीर्वाद टाकले जातात .धर्मांतर केले आरक्षण गेले हा निर्णय घेण्यात यावा.कैलासजी अलीयार यांनी

पुराण काळापासून आदिवासी समाज महादेवाला मानणारा असून  त्याची दिशाभूल करून धर्मांतर करण्याचे काम काही अपप्रवृत्ती करत असून इंग्रजांनी देशात येऊन जनजाती समाजाला विभक्त करण्याचा डाव केला तेच षडयंत्र आजही चालू असून जनजाती समाजाने जागृत होण्याची गरज आहे.देशात ८टक्के राखीव आरक्षण आहे  ८० टक्के लाभ मुस्लिम ,ख्रिश्चन समाज घेत आहे. स्वार्थासाठी धर्मांतर केले मात्र आरक्षण रद्द केले नाही. त्यांचे आरक्षण रद्द करून सवलती थांबविण्याची गरज आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी देश  ,देव ,धर्मासाठी एकत्र येण्याची गरज आहे.तालुक्यात बारी, मुळा, केळी ,भंडारदरा,तिरढे परिसरात धर्मांतर पाय रोवत असून त्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.तर महंत देवबाप्पा यांनी आदिवासीनी व्यसनमुक्त होण्याची गरज आहे.दारू मुळे आपली संस्कृती, आस्था,परंपरा सोडून धर्मांतर करत आहे.

यावेळी पांडुरंग भांगरे,काळू भांगरे,गंगाराम धिंदळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी तीन ठराव घेण्यात आले बोगस आदिवासींना काढून त्या जागी खऱ्या आदिवासीला जागा द्यावी,भूमिहीनांना सरकारी जागा मिळावी,वन हक्क जमिनीचा सात बारा आदिवासींना मिळावा सूत्रसंचलन  जनजाती जिल्हा अध्यक्ष संतोष कचरे आभार शंकर  घारे यांनी मानले


Post a Comment

0 Comments