ट्रक आणि कारच्या धडकेने भीषण आग, कारमधील सर्वजण जळून खाक

ट्रक आणि कारच्या धडकेने भीषण आग, कारमधील सर्वजण जळून खाक

वेब टीम मोडासा : गुजरातमधील मोडासा जिल्ह्यातील आलमपूर गावाजवळ आज सकाळी मोठा अपघात झाला. दोन ट्रक आणि कार यांच्यात अपघात झाला, त्यामुळे तिन्ही वाहनांनी पेट घेतला. या घटनेत तीन वाहनांमध्ये 6 जण अडकून जिवंत जाळले गेले. बराच वेळ वाहनांना लागलेली आग विझवता आली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकचा क्लिनर, दुसऱ्या ट्रकचा चालक आणि क्लिनर आणि कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर कार चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला आहे.

ट्रकमध्ये केमिकल भरले होते

घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी सांगितले की, दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि एक कारही त्यांच्या धडकेत आली. केमिकलने भरलेला ट्रक होता, त्यामुळे तिन्ही गाड्यांना आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला होता.

महामार्गावर 10 किमी लांब जाम

या भीषण अपघातामुळे मोडासा-नडियाद महामार्ग बंद करण्यात आला आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे 10 किमी लांब वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

ट्रक चालकाने उडी मारून जीव वाचवला

घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरटीओ कर्मचाऱ्याने सांगितले की, चालकाने ट्रकमधून उडी मारली होती. यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, उडी मारताना तो जखमी झाला. तर त्याच्या ट्रकचा क्लिनर ट्रकमधून बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी, दुसऱ्या ट्रकमध्ये दोन मृतदेह आहेत, जे चालक आणि क्लिनरचे असू शकतात. 

Post a Comment

0 Comments