किल्ला सुशोभीकरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा : आ.संग्राम जगताप

किल्ला सुशोभीकरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा : आ.संग्राम जगताप

वेब टीम नगर: राज्य शासनाने भुईकोट किल्ला सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी सुमारे 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज किल्ला दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी बैठकीचे आयोजन केले होते यामध्ये लष्कर विभागाचे अधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी निलेश भदाणे यांनी तातडीने किल्ला दुरुस्ती व सुशोभीकरणाचा आराखडा तयार करून लष्कर विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे यासाठी मी स्वतः पाठपुरावा करील अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी झालेल्या बैठकीत दिली.

भुईकोट किल्ला सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या दालनात आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लष्कर विभागाचे अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जयंत कुलकर्णी , इतिहास प्रेमी भूषण देशमुख, वृक्षमित्र सुरेश खामकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले की, शासनाकडून भुईकोट किल्ला दुरुस्तीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी निधी आणला आहे. यासाठी आज सर्व विभागांच्या बैठकीचे आयोजन केले या बैठकीमध्ये हत्ती दरवाजा सुशोभीकरणाचे काम, नेताजींच्या कक्षाकडे जाण्यासाठी इलेक्ट्रिक गाडीची सोय करणे, स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची फोटो गॅलरी तयार करणे, झुलत्या पुलाची दुरुस्ती करणे याच बरोबर 26 जानेवारी ,15 ऑगस्ट व महाराष्ट्र दिनी  पोलीस परेड ग्राउंड वर होत असलेला झेंडावंदनाचा कार्यक्रम भुईकोट किल्ला या ठिकाणी करण्यात यावा यासाठी परवानगीची मागणी तसेच या तीन झेंडावंदनाच्या दिवशी सात दिवस किल्ला सर्वांसाठी खुला करावा याचबरोबर जॉगिंग ट्रॅक परिसरामध्ये लाईटची व्यवस्था करणे आदी विषयांवर लष्कराच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा झाली असून, लवकरच प्रस्ताव तयार करून या सर्व विषयांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments