किरकोळ वादातून तलवारीने मारहाण

किरकोळ वादातून तलवारीने मारहाण 

वेब टीम नगर : मित्रांसोबत सोबत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या मारामारीत होऊन एकाला घरच्या गच्चीवरून खाली फेकण्यात आले तर दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना नगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात घडली असून या घटनेत रोहित मिलन जोशी, अजित बाबर, स्वप्निल सब्बन हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अंकुश चत्तर, महेश मते, चंदन ढवण, शिवलिंग शिंदे, अक्षय टेकाळे, प्रतीक मगर, सोन्या कोहक, अजिंक्य भुजबळ, मयुर सूर्यवंशी या तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तोफखाना पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही घटना २३ मे रोजी घडली होती घटनेतील सर्व एकमेकांचे मित्र आहेत मात्र किरकोळ वादातून गंभीर घटना घडली असून. एकूण नऊ लोकांवर दोन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढया टोकापर्यंत भांडण जाण्याचं कारण काय याचा तपास आता पोलीस करत असून.

नगर शहरात तलवारी वापरण आता सर्रास सुरू झाला आहे. मागील आठवड्यातच एका लग्नाच्या कार्यक्रमात तलवारी घेऊन तरुण नाचत असताना व्हिडिओ व्हायरलं झाला होता. तर या घटनेत तलवारीने हल्ला करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून नगर शहरातही तलवारी भरपूर असल्याचे समोर येत आहे.Post a Comment

0 Comments