काजवा महोत्सव ग्रामपंचायत ,वनसमित्यांच्या मदतीने पार पाडणार
वेब टीम अकोले : भंडारदर्याच्या अभयारण्यात असणार्या स्थानिकांची उपजीविकाच पर्यटनावर अवलंबून असल्याने काजवा महोत्सव व्यवस्थित पार पाडून काजव्यांच्या कालचक्रावर थोडाही विपरीत परिणाम होणार नाही. यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन महोत्सव व्यवस्थित पार पाडण्यास सज्ज झाले आहेत. यासाठी वन विभागाच्या हद्दीत असणार्या ग्रामपंचायत व वन समित्यांची विशेष मदत घेण्यात येत आहे. काजवा ज्या परिसरातील झाडावर आढळून येतो त्याठिकाणापासून कमीत कमी शंभर ते दीडशे मीटर अंतरावर गाडी उभी करुन काजवे बघण्यासाठी पायी चालत जावे लागणार आहे. वन विभागाच्या हद्दीत दहा ते बारा ठिकाणी पार्किंग झोन उभारण्यात आले असून पर्यटकांच्या वाहनांच्या तपासणीसाठी जागोजागी टोलनाकेही उभारण्यात आले आहेत.
0 Comments