कौठवाडी येथील बिरोबाची 'कठ्या'ची यात्रा उत्साहात

कौठवाडी येथील बिरोबाची 'कठ्या'ची यात्रा उत्साहात 

यात्रेत नवसाचे ९१ कठे पेटविण्यात आले 

वेब टीम अकोले (शांताराम काळे  यांज कडून ): तब्बल दोन वर्षांनी  हाईहुईई असा लयबद्ध चित्कार करत भाविक बिरोबाचा गजर करत .  साकीरवाडी येथील मानाची काठी मंदिरासमोर येताच   रविवारी अकोले तालुक्यातील कौठवाडी येथे बिरोबाची  यात्रा शुभारंभ झाला लाखो भाविकांनी उपस्थिती दाखवत ९१ कठे पेटवून रात्र जागविण्यात आली . डोक्यावर पेटलेले कठे .... त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला ... शरीरावर ओघळणारे उकळते तेल ... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद ... बिरोबा दैवताचा नावाचा जयघोष ... संबळ , धोदाना -पिपाणी , डफ , ताशा अशा पारंपारिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने "हाई ,हुई ,असे लयबद्ध चित्कार करत भाविक लोक बिरोबाचा गजर करत नवस फेडत होते .

अक्षय तृतीयानंतर पहिल्या रविवारी गेली १०० वर्षांपासून बिरोबाची मोठी यात्रा भरते , त्यातून निसर्ग , परंपरा , संस्कृती असा त्रिवेणी संगम उपस्थितांना पाहायला मिळतो .  खोल दरीत अतिदुर्गम असणारे आदिवासी कौठवाडी एक खेडे अनेक वर्षांची परंपरा जपत शिस्त बद्ध पद्धतीने बिरोबा देवाची यात्रा भरवते श्रद्धेने लाखो भाविक या यात्रेसाठी येतात ,महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्राउत्सव बिरोबाच्या देवस्थानाची आख्यायिका मोठी मजेशीर आहे आद्य पुजाऱ्याचे नाव भोईर त्यामुळे पूजेचा पहिला मान भोईर याना मिळतो तर साकीरवाडी ग्रामस्थांना काठीचा मान  असतो.

 पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते मात्र ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व  माजी आमदार वैभव पिचड यांच्यास्थानिक विकास निधीतून येथे टुमदार मंदिर व सभामंडप बांधला आहे. चहुबाजूने सह्याद्रीच्या डोंगररांगा व कोहळा दरीत हे बिरोबा मंदिर देवस्थान आहे बिरोबा देवाला केलेला नवस फेडण्यासाठी राज्यातून लोक येतात येथील यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे पेटलेले कठे डोईवर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या चौथऱ्या भोवती फेऱ्या मारतात . प्रत्येक फेऱ्यागणिक डोक्यावर घेतलेल्या मडक्यात (कठे )किलोकिलोने तेल ओततात व ते गरम तेल भाविकांच्या उघड्या अंगावर ओघळत येते निखाऱ्याने व तप्त तेलाने भाविकांना कुठलीही  दुखापत होत नाही असा समज परंपरेने चालत आला आहे. 

यावर्षी दत्तात्रय भोईर ,वसंत भांगरे , दत्तात्रय भांगरे , निवृत्ती भांगरे , नितीन धराडे , , मधुकर कोंडार , किसन भांगरे , भाऊराव भांगरे , सुरेश भांगरे , सावळेराम भांगरे , देवराम भांगरे , बाळू घोडेसह ६५ भाविकांनी बिरोबा कि जय म्हणत आपले कठे पेटवून आपला नवस पूर्ती करीत रात्र जागवली  कोट - सुरेश भांगरे (उपसरपंच कौठवाडी ) शंभर वर्षाची परंपरा असलेली कठ्याची  यात्रा यावर्षीही मोठ्या प्रमाणात भरली असून या यात्रेसाठी परदेशी  नागरिक तसेच राज्यातून व राज्याबाहेरून भाविक आले असून  या माध्यमातून बिरोबा आमचे श्रद्धास्थान असून आमची लोकसंस्कृतीचे संवर्धन होते .

  दत्तात्रय भोईर -आमच्या भोईर लोकांना कठे पूजेचा मान असतो . दरवर्षी कौठवाडी व साकीरवाडी ग्रामस्थ एकोप्याने हा उत्सव साजरा करतात लाखो भाविक मंदिरात येऊन दर्शन घेतात त्यामुळे या गावाच्या यात्रेची महती सात समुद्रापार पोहचली आहे  

वैभव पिचड (माजी आमदार) यांनी  बिरोबाचे दर्शन घेतले यापुढे  देशात व राज्यात कोरोनाचे संकट येऊ देऊ नको असे साकडे घातले . 

Post a Comment

0 Comments