आता तर माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच ईडीकडे तक्रार

आता तर माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच ईडीकडे तक्रार


वेब टीम मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या हितसंबंधांसाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन आधी स्टेट बँक ऑफ इंडियामधून होत होते.मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावर असतांना आपल्या पदाचा गैरवापर करत हे व्यवहार एसबीआयकडून काढून घेतले आणि त्यांची पत्नी काम करत असलेल्या ॲक्सिस बँकेकडे हस्तांतरित केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संबंधित प्रकरणी तक्रारदाराने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments