जिल्ह्यात वाजला सलोख्याचा 'भोंगा '

जिल्ह्यात वाजला सलोख्याचा 'भोंगा'

वेब टीम नगर :  राज्यात सध्या भोंग्या वरून वातावरण तापलेले असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र सलोख्याचा भोंगा  वाजला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुस्लिम बांधवांनी आज सकाळी एकही मस्जिद वर लाऊड स्पीकरवर अजान म्हटली नाही.

तर देशातील लाखो लोकांचे श्रद्धा स्थान असलेले शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरात रोज होत असलेली महाआरती लाऊड स्पीकर विना झाली असून अहमदनगर जिल्ह्याने एक वेगळा आदर्श महाराष्ट्रा समोर घालून दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मज्जिद मधील इमाम अथवा विश्वस्त यांची बैठक घेऊन त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले होते त्याला अहमदनगर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून आज सकाळी पहाटेच्या सुमारास एकही मस्जिद वरून लाऊड स्पीकर वरून अजान झालेली नसल्याने एक वेगळा आदर्श अहमदनगर जिल्ह्याने सर्वांसमोर घालून दिला आहे.

Post a Comment

0 Comments