१३५ मशिदींनी तोडले न्यायालयाचे नियम
आम्हीही हनुमान चालिसा पठण करू : राज ठाकरेंची घोषणा
वेब टीम मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, काही मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे आमचे लक्ष आहे . मशिदींवरील भोंगे उतरेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार . लाऊडस्पीकरच्या वादावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू आहे. मशिदींतील बेकायदेशीर लाऊडस्पीकरद्वारे अजान बंद होईपर्यंत आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या संपूर्ण वादावर राज ठाकरे बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत होते.
राज ठाकरे पुढे म्हणाले, 'माझे म्हणणे आहे की सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर मशिदींमधून हटवले पाहिजेत, ते जोपर्यंत हटवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू. आम्ही अजानच्या वेळी मशिदीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करत राहू. सरकार जर आपल्या आदेशाचे पालन करत नसेल तर सर्वोच्च न्यायालय काय करते हे मला पाहावे लागेल.
135 मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचा नियम मोडला
ठाकरे म्हणाले की, आम्हाला राज्यात शांतता हवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या १३५ मशिदींवर आज पोलीस काय कारवाई करत आहेत. पोलिस केवळ आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कारवाई होते की नाही हे पाहत आहोत.
मनसेचे 250 हून अधिक कार्यकर्ते ताब्यात
दुसरीकडे पोलिसांनी बुधवारी मनसेच्या 250 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, हे कार्यकर्ते मशिदींभोवती लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करण्याचा प्रयत्न करत होते.
0 Comments